SHRI TULJABHAVANI FESTIVAL
श्री तुळजाभवानी मातेचे धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सण उत्सव • चैत्र शुद्ध प्रतिपदा(गुडीपडवा)

 • श्री तुळजाभवानी मातेस साखरेचा हार(गाठी) श्री देवीस घालण्यात येतो,मंदिराच्या मुख्य शिखरासमोर छतावर गुढी उभारण्यात येते, श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजेनंतर महावस्त्र नेसीवले जातात धूप आरती नंतर भाविकांना नव वर्ष सुख समृद्धी चे जाओ यासाठी प्रार्थना करण्यात येते.


 • चैत्र शुद्ध द्वितीया

 • सकाळी चरणतीर्थ, अभिषेक व पुजा आरती हे विधी नेहमी प्रमाणे होतात. चैत्र महिन्यापासूनच कडक उन्हाळ्यास सुरवात होते म्हणून दुपारी 1:00 ते 4:00 पर्यंत श्री देवीस चांदीच्या पंख्याने वारा घालतात.


 • चैत्र पौर्णिमा

 • चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात येतो, या दिवशी तुळजापूर मध्ये भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होते.


 • वैशाख शुद्ध तृतीया(अक्षय तृतीया)

 • अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तसेच पितृ पूजनाचा दिवस असल्याने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात.


 • वैशाख शुद्ध चतुर्दशी(नृसिंह जयंती)

 • नृसिंह जयंती निमित्ताने मंदिरातील दैनंदिन पुजे नंतर नृसिंहसरस्वती मंदिर जवळील ओवरीत कच्ची डाळ आणि कच्या आंब्याचे पन्हे असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो.


 • ज्येष्ठ पौर्णिमा(वट पौर्णिमा)

 • वट पौर्णिमा या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात आणि शहरातील सुवसनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात.


 • आषाढ शुद्ध द्वितीया

 • श्री गजानन महाराज यांच्या पालखी मंदिरात श्री देवीच्या दर्शनासाठी येते. पालखी शहरात मुक्कामी असते.


 • आषाढ पौर्णिमा(गुरुपौर्णिमा/व्यासपोर्णिमा)

 • या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात, गुरुपौर्णिमा निमित्ताने दुपारी 12:00 वाजता अरण्य बुवा मठात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करतात. श्री देवीच्या पूजेनंतर महंत आदीचा यथोचित सत्कार करण्यात येतो.


 • श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी)

 • श्री देवीचे चरण तीर्थ झाल्यानंतर भवानी शंकराचे पुजारी, होमाच्या समोर भवानीशंकराचा पितळेचा नागफना मांडून नागदेवता तयार करून ठेवतात, भाविक भक्त नागोबाला दूध लाह्या, उकडलेले कानवले असा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी उत्तरपूजा करून, कल्लोळ तीर्थ मद्ये विसर्जन केले जाते.


 • श्रावण शुद्ध षष्ठी (गौर पुजा)

 • गौर पुजे निमित्ताने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकारघालण्यात येतात.


 • श्रावण अमावस्या(बैल पोळा)

 • श्री देवीच्या दैनंदिन पुजा होतात, सायंकाळी 5:00 वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमान वेस भागात आगमन होते त्यांना श्री देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते.


 • भाद्रपद शुद्ध चतुर्दशी(अनंत चतुर्दशी)

 • श्री तुळजाभवानी मंदिर तर्फे गणेश विहार येथे पार्थिव गणेशाची स्थापना करण्यात येते. आणि अनंत चतुर्दशी दिवशी कल्लोळतीर्थ मध्ये विसर्जन करण्यात येते.


 • भाद्रपद वद्य अष्टमी (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी{घोर} निद्रा)

 • या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते.


 • श्री शारदीय नवरात्र उत्सव / दसरा उत्सव

 • आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते ,नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र उत्सव काळात दैनंदिन छबिना काढण्यात येतो.
  श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.


 • दिपावली उत्सव

 • अश्विन ते कार्तिक महिन्यात येणारा दिपावली उत्सवही तुळजाभवानी मंदिरात साजरा करण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी द्रव्यासह स्नान घातले जाते आणि दैनंदिन पुजा विधी होतात.


 • काळभैरव भेंडोळी उत्सव

 • काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात.


 • कार्तिक शुद्ध प्रतिपदा(पाडवा)

 • दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने त्यादिवशी श्री देवीला फराळाचे विविध नैवेद्य दाखवतात मंदिर मध्ये कलश पुजा पाडवा वाचन कार्यक्रम साजरा केला जातो


 • कार्तिक शुद्ध द्वादशी (तुळशी विवाह)

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तुळशी विवाह करण्यात येतो.


 • कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

 • त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने कल्लोळ तीर्थ स्वच्छ धुवून साडेसातशे कापसाच्या वाती पणत्या मद्ये ताटवा पुजन केले जाते. या पणत्या द्रोणावर ठेऊन पाण्यावर तरंगत सोडतात.


 • मार्गशीर्ष चंपाषष्ठी/मार्गशीर्ष पौर्णिमा(दत्त जयंती)/पौष शुद्ध प्रतिपदा (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा)

 • या दिवसा पासून शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होतो


 • श्री शाकंभरी नवरात्रत्सव

 • नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते , नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा करण्यात येतात, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घटस्थापना होते याच नवरात्र उत्सव मद्ये गावातून जल यात्रा काढली जाते.


 • तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो.


 • ग्रहण कालावधी

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोवळ्यात आणि पांढर्याशुभ्र वस्त्रा मध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालवधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते.


 • श्री तुळजाभवानी निद्रा

 • श्री तुळजाभवानी निद्रा ह्या तीन प्रकारच्या आहेत. श्री तुळजाभवानी मातेची मुळ मूर्ती हि सिहासनावरून उचलून श्री देवीच्या पलंगावर निद्रा साठी असते. श्री देवीचे असे रूपाचे दर्शन घेण्यासाठी हजोरो भाविक – भक्त दर्शनास येतात.


 • श्री तुळजाभवानी मातेचा छबिनाबद्दल माहिती

 • छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.
  श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील २१ दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात.
  महत्व :- श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.SHRI TULJABHAVANI FESTIVAL
Chaitra Navratri festival 2023


चैत्र नवरात्र उत्सव हा तुळजाभवानी देवीचा साजरा होत नाही वर्षातून दोन वेळा म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव आणि शाकंभरी नवरात्र हे साजरे करण्यात येतात, अनेक भक्त हे चैत्र नवरात्र उत्सव देशातील विविध देवीच्या ठिकाणी साजरे होतो त्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी देवीची पूजासेवा करतात. कृपया भक्तांना सर्व माहिती घेऊनच पूजा सेवा करावी हि विनंती . पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते. पहिला दिवस : बुधवार 22 मार्च 2023, चैत्र प्रतिपदा, घटस्थापना, दैवी शैलपुत्री दुसरा दिवस : गुरुवार 23 मार्च 2023, द्वितीया, देवी ब्रह्मचारिणी तिसरा दिवस : शुक्रवार 24 मार्च 2023, तृतिया, देवी चंद्रघंटा चौथा दिवस : शनिवार 25 मार्च 2023, चतुर्थी, देवी कुष्मांडा पाचवा दिवस : रविवार 26 मार्च 2023, पंचमी, देवी स्कंध माता सहावा दिवस : सोमवार 27 मार्च 2023, षष्ठी, देवी कात्यायणी सातवा दिवस : मंगळवार 28 मार्च 2023, सप्तमी, देवी कालरात्री आठवा दिवस : बुधवार 29 मार्च 2023, अष्टमी, देवी महागौरी नववा दिवस : गुरुवार 30 मार्च 2023, नवमी, देवी सिद्धिदात्री Chaitra Navratri festival is not celebrated of Tuljabhavani Devi two times in a year i.e. Sharadiya Navratri festival and Shakambhari Navratri are celebrated, many devotees worship Sri Tuljabhavani Devi according to which Chaitra Navratri festival is celebrated at various goddess places in the country. Please request the devotees to perform the puja service after taking all the information.

Read More.. Share

Shri Tuljabhavani opening time during Diwali and Christmas holidays


Shree Tuljabhavani Temple from 14/10/2022 to 31/12/2022 on Tuesdays, Fridays, Sundays and Purnima as well as Diwali and Christmas holidays in order to facilitate the darshan of the devotees who come for darshan of Shree Devi ji in the morning at 01:00 am and the temple at 01:00 am. A public announcement has been published on behalf of Shri.Tuljabhavani Mandir Sansthan Tuljapur on 13/10/2022 for the darshan of the devotees to start at this time, please take note of this.The purpose of the above public announcement is to inform me and the devotees coming to the city of Tuljapur. श्री तुळजाभवानी मंदिर हे दिनांक १४/१०/२०२२ ते ३१/१२/२०२२ या कालावधीत मंगळवार ,शुक्रवार ,रविवार आणि पौर्णिमा तसेच दीपावली व नाताळ सुट्टी निमित्त श्री देवीजींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतीर्थ रात्रौ ०१:०० am वाजता आणि मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी या वेळेस सुरु होईल यासाठी श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या वतीने जाहीर प्रगटन दिनांक १३/१०/२०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले आहे , कृपया भाविक भक्तांना याची नोंद घ्यावी . वरील जाहीर प्रगटन ची माहिती माझ्याकडे व तुळजापूर च्या नगरीत येणाऱ्या भाविक-भक्तानां कळावी हाच हेतू आहे .

Read More.. Share

Book E-Puja